अध्योध्या राममंदिरावर फडकला धर्मध्वज, मोदी भावुक:म्हणाले- आता मानसिक गुलामीतून मुक्तीचे ध्येय

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी, पंतप्रधान मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले. सकाळी ११:५० वाजता, अभिजित मुहूर्ताच्या वेळी, बटण दाबताच १६१ फूट उंच शिखरावर २ किलोचा भगवा ध्वज फडकला. यासोबतच राम मंदिराचे काम पूर्ण झाले. यादरम्यान, पंतप्रधान मोदी भावुक झाले. त्यांनी हात जोडून धर्मध्वजाला नमस्कार केला.

पंतप्रधान म्हणाले-“आज शतकानुशतके जुन्या जखमा भरून निघाल्या आहेत. आपल्या देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करू.”

तत्पूर्वी, राम मंदिरात, पंतप्रधान मोदींनी मोहन भागवत यांच्यासमवेत पहिल्या मजल्यावरील राम दरबारात पहिल्यांदाच पूजा आणि आरती केली. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. पंतप्रधान रामलल्लासाठी वस्त्र घेऊन आले. त्यांनी सप्त ऋषींचे दर्शन घेतले, भगवान शेषवतार आणि लक्ष्मण यांची पूजा केली.

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी साकेत कॉलेजपासून रामजन्मभूमीपर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ताफ्यावर फुले उधळली आणि जागोजागी महिलांनी त्यांचे स्वागत केले.

यापूर्वी ध्वजारोहण समारंभासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आले होते, अशी चर्चा होती, परंतु अद्याप कोणीही पोहोचले नाही. सध्या, शंकराचार्यांना वगळता राम मंदिर परिसरात देशभरातील मठांचे संत उपस्थित आहेत.

शहर 1000 क्विंटल फुलांनी सजवले आहे. मंदिराची 5-स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. एटीएस-एनएसजी कमांडोनी संपूर्ण परिसर वेढला आहे. याशिवाय, एसपीजी, सीआरपीएफ आणि पीएसीचे जवानही तैनात आहेत.

यापूर्वी सकाळी रामलल्लाची आरती करण्यात आली. रामलल्लानी आज सोने आणि रेशीम धाग्यांनी बनवलेले पीतांबर वस्त्र परिधान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *