ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणासह निवडणूक होणार असल्याने व्यक्त केले समाधान

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याबाबतचे हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले आहे.

नवीन खंडपीठ २१ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करेल. चंद्रपुरात ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात कुठेही निवडणुकांवर स्थगिती दिली नाही. हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे आणि त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. सुप्रीम कोर्टाने २०२२ पूर्वीच्या आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले असल्याने ओबीसी आरक्षण सुरक्षित राहील, अशी खात्री असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *