या भागात कासव- घुबड यांचा वापर करत गुप्तधनासाठी अघोरी पूजा होत असल्याचा तपासात खुलासा
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चिचडोह बॅरेज परिसरात कासव तस्करी प्रकरणी नवे खुलासे झाले आहेत. वनपथकाने दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून कासवाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली होती. यातील आरोपींच्या प्राथमिक तपासात आणि मोबाईलची तपासणी केल्यावर काळी जादू- जादूटोणाविषयक व्हिडीओ मिळाले आहेत. या भागात कासव- घुबड यांचा वापर करत गुप्तधनासाठी अघोरी पूजा होत असल्याचे निष्पन्न झाले असून या पूजेत विधवा- कुमारीकांचाही वापर होत असल्याचा संशय आहे.
वनविभागाने आता या प्रकरणाचा तपास वेगवान तपास केला आहे. मात्र वनविभागाला यातील मास्टरमाईंड भोंदू पुजारी मात्रा गवसलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. वनपथकाने आतपर्यंत संबंधित 17 जणांचे बयान नोंदविले आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. राज्यभर वेगवेगळ्या भोंदूगिरीची चर्चा होत असताना चंद्रपुरातील कासव तस्करी प्रकरणी या नव्या खुलाशाने खळबळ उडाली आहे.
