चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. शहरापासून जवळ असलेल्या चिचोली शेत शिवारात सरपण गोळा करण्यासाठी केलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. ही घटना आज सकाळी उजेडात आली.
नारायण गेडाम 60 असे शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान त्याचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढल्यानंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला. वनपथक घटनास्थळी पोचले असून ग्रामस्थांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी पुढे रेटली आहे.
