चंद्रपूर जिल्ह्य़ातील चिमूर तालुक्यात वाघाचा हल्ला, शेतकरी ठार, परिसरात भीतीचे सावट

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने एक शेतकरी आपला जीव गमावला आहे. चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवन क्षेत्रात ही घटना घडली असून, साठ वर्षीय नीलकंठ भुरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह नाल्याजवळ खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ शासकीय नियमानुसार मदत देण्यात आली आहे. वाघा हल्ल्याच्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *