महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा बँकेचा उद्देश : दिनेश चोखारे

महिला बचत गटांना तब्बल १४ लाखांचे कर्जवाटप

ताडाळी :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला उद्योजकतेला भक्कम चालना देत ताडाळी शाखेमार्फत दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला बचत गटांना तब्बल १४ लाख रुपयांचे कर्जवाटप करून महत्त्वपूर्ण मदत केली आहे.

छोट्या व मध्यम उद्योगांना गती देणे, तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा बँकेचा मुख्य संकल्प असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी लघु उद्योग, सेवा व्यवसाय आणि उद्यमशीलतेची नवी दारे उघडत आहेत. बँकेचे हे आर्थिक पाठबळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे आणि महिलांच्या प्रगतीसाठी परिवर्तनशील ठरणार असल्याचे चोखारे यांनी नमूद केले.

याप्रसंगी आनंदी महिला बचत गट ताडाळी, पंचशील महिला बचत गट ताडाळी, आणि जयपेरसापेन महिला बचत गट ताडाळी या गटांतील महिलांना एकूण १४ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला शाखाधिकारी भोयर साहेब, कर्मचारी सुरेश निखाडे, श्याम चव्हाण, गीता मोहितकर तसेच शिपाई राहुल मालेकर, आनंदी महिला बचत गट ताडाळी, पंचशील महिला बचत गट ताडाळी, जयपेरसापेन महिला बचत गट ताडाळी या बचत गटांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थिती होते.

महिला सक्षमीकरण आणि उद्योगवृद्धीच्या दिशेने उचललेले सीडीसीसी बँकेचे हे पाऊल ताडाळी परिसरासाठी महत्त्वाची आणि सकारात्मक घडामोड मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *