चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात मतदारांना मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उफराटा प्रकार करू नका असे केले आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात उतरलेल्या दिग्गज भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उफराटा प्रकार करू नका असे आवाहन केले. त्यांनी भाषणात काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकला तिथे, आता विकास काँग्रेसकडूनच करा, असा बोर्ड लावणार असल्याचे म्हटले.
