कायदा-सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे 35 व्या पोलीस स्टेशनची निर्मिती

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते उद्घाटन

गडचिरोली जिल्ह्रातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी धानोरा तालुक्यातील पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत असलेल्या पोलीस मदत केंद्र चातगावला पोेेलीस स्टेशन म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे. या अन्वये नवीन पोलीस स्टेशन चातगाव ची निर्मिती करण्यात आली असून या भागातील गुन्हेगारी आणि नक्षली कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रभावीपणे याचा वापर होण्यास मदत होणार आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या हस्ते आज पोेलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन पार पडले.

सन 2010 साली चातगाव येथे पोलीस मदत केंद्राची निर्मीती करण्यात आली होती. सद्यस्थितीत पोेलीस स्टेशन चातगाव अंतर्गत 26 गावे जोडली जाणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांना तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसोबत पोलीसांचा संवाद वाढून नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

निलोत्पल यांनी पोस्टे चातगाव अंतर्गत सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बॅरेंक, इत्यादींना भेट देवुन पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *