* क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्राची यशस्वी उकल; तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषणाद्वारे गडचिरोली पोलीसांनी आरोपीला केले अटक
* स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोट येथील तपास पथकांची संयुक्त कारवाई
* शवावर असलेल्या जखमा डावखु-या आरोपीने केल्या असल्याचं निष्पन्न झाल्याने मिळाला सुगावा
दिनांक 05 सप्टेंबर 2026 रोजी मौजा नारायणपूर ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील महिला नामे गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड, वय 60 वर्षे, रा. नारायणपूर चक नं. 2, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली या शेतात गेल्या असताना संध्याकाळ पर्यंत घरी परत न आल्यामूळे त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी शेतात शोध घेतला असता, त्यांचा मृतदे ह संशायस्पद स्थितीत आढळुन आला. यावरून पोस्टे चामोर्शी येथे अप क्र. 460/2026 कलम 103 (1) भा. न्या. सं. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा असल्याने गुन्ह्रातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलीसंापुढे मोठे आव्हान होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकायांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोमकें घोट व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुरवातीला कोणतेही पुरावे नसताना सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांनी मयताच्या मृत्यदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण करून मृत्यदेहावर आढळून आलेल्या जखमांवरून आरोपी हा डावखुरा असावा असा निष्कर्ष काढल्याने तपासाला नवी दिशा मिळाली. त्याअनुषंगाने तपास पथकांनी अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवून मयताचे कौटुंबिक सबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे संदीप टेकाम याला ताब्यात घेतले होते. गुन्ह्राच्या अनुषंगाने त्याची अधिक विचारपूस केली असता, त्याने पूर्व वैमनस्यातून व जुन्या वादावरुन गोपीकाबाई गायकवाड हिचा काठीने मारहान करुन त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. यावरून काल दिनांक 29/09/2026 रोजी आरोपी संदीप रावजी टेकाम, वय 35 वर्षे, रा. नारायणपूर चक नं. 2, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, यास मोठ¬ा शिताफिने अटक करण्यात आली आहे. आरोपी संदीप टेकाम याला मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी चामोर्शी यांचे समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास 04 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्रात केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी निष्पन्न करुन त्याला अटक करुन अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. आगलावे, पोमकें घोटचे सपोनि. कल्पेश खारोडे, पोस्टे रेगडीचे सपोनि. गवळी, स्थागुशाचे पोउपनि. विश्वा कराळे व अंमलदार यांनी पार पाडली. सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोमकें घोट येथील अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
