चंद्रपुरात 64 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात, एकूण 14 नाटकांचे होणार सादरीकरण

चंद्रपुरात 64 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची उत्साजात सुरुवात झाली. चंद्रपूर केंद्रावर एकूण 14 नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी नाट्यगृहात या स्पर्धेची सुरुवात झाली. प्रसिद्ध नाट्यकर्मी डॉ. शरद सालफळे, डॉ. श्याम मोहरकर यांच्यासह स्पर्धा परिक्षकांची उपस्थिती होती. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ऑफिसर्स रिक्रिएशन केंद्राच्या ‘एनोनिमस’ नाटकाने स्पर्धेची सुरुवात झाली. गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आदी केंद्रावरील नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. या नाट्य स्पर्धेला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *