गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यात रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस प्रा. लि.च्या रुग्णालय आणि कॉलेज कँपसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य क्रांती आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार


गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातल्या अतिदुर्गम राजेश्वरपल्ली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड च्या रुग्णालय आणि कॉलेज कॅम्पसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सुमारे चौदाशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केजी ते पीजी शाळा, वैद्यकीय महाविद्यालय ,रुग्णालय, फार्मसी, नर्सिंग असे अनेक शैक्षणिक आयाम असणार आहेत. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागासह सिरोंचा तालुका आणि तीन राज्यांचा सीमावर्ती भाग विकासाच्या प्रवाहात येणार आहे.

या भागातील नागरिकांना मोठ्या शहरात अथवा लगतच्या तेलंगणात जावे लागते. मात्र आता या ठिकाणी 300 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

या भागातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राणा समूहाने गडचिरोली सारख्या मागास भागात सामाजिक भान उभारून केलेल्या या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *