तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद, वनविभागाच्या पथकाला मोठे यश

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात भीतीचं सावट निर्माण करणारा आणि तीन जणांचा बळी घेणारा वाघ अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे. आंबोली परिसरातील जंगलात या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात यश आलं.

गेल्या पाच दिवसांपासून या वाघाच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू होती. तीन नागरिकांच्या मृत्यूनंतर परिसरात उसळलेल्या जनआक्रोशानंतर गावकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं. अखेर वाघ जेरबंद झाल्याने परिसरात सुटकेचा निश्वास सोडण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *