भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तसेच अखंड भारताचे पुरस्कर्ते
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त
भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, त्यागमय आणि प्रेरणादायी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
“राष्ट्र प्रथम”
हा त्यांचा विचार आजही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या कार्यक्रमात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन करताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रहिताच्या विचारांचा प्रसार करण्याचे आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विशाल निंबाळकर, राजेश सुरावर, नम्रता ठेमस्कर, आचार्य रवी लोणकर, रुद्र नारायण तिवारी, मुग्धा खांडे, चंद्रकला सोयाम, वाणी सादलावार तसेच चांद सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले.
