चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात रील बनवणे पडले महागात

 प्रकल्प प्रशासनाने देवतळेंना ठोठावला पाच हजारांचा दंड , नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडोबा प्रशासनाची कठोर कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीदरम्यान रील बनवणे महागात पडले. प्रकल्प प्रशासनाने देवतळेंना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात भेद न करता कठोर कारवाई केली आहे. वन्यजीव संरक्षण आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मोबाईल वापरावर बंदी अत्यंत महत्त्वाची आहे. ताडोबाच्या सफारी दरम्यान कोअर आणि बफर क्षेत्रात जवळ मोबाईल बाळगण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या कठोर कारवाईचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *