चंद्रपूरच्या खा. प्रतिभा धानोरकर आणि धानोरकर कुटुंबाच्या दबावामुळे कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागल्यावरही अधिकाऱ्यांनी जमीन ताब्यात न दिल्याचा केला आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील परमेश्वर मेश्राम या केरोडा गावातील शेतकऱ्याने जमीन फेरफार प्रकरणी विषप्राशन केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास 24 तासानंतर देखील नकार दिलाय. सुमारे 20 वर्ष आधी दिवंगत खा. बाळू धानोरकर यांनी मेश्राम यांची जमीन आपल्या नावे केली. प्रकार लक्षात येताच जाब विचारल्यावर त्यांनी 7 चेक दिले ते सर्व बाऊन्स झाले. अखेर मोठा न्यायालयीम संघर्ष केल्यावर निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागला.
मात्र भद्रावती चे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी चंद्रपूरच्या खा. प्रतिभा धानोरकर आणि धानोरकर कुटुंबाच्या दबावामुळे कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट पीडित कुटुंबाकडून 4 लाख रुपये उकळण्यात आले. आपल्या बाजूने लागल्यावरही अधिकाऱ्यांनी जमीन ताब्यात न दिल्याने आता दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, जमीन ताब्यात द्या, नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे. यासंदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे.
