मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार होता वावर
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार शिरकाव करत मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे.
जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी झाल्यावर्णमानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून या वाघाला जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली आहे.
