दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, ‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्च चे आयोजन चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून करण्यात आले.
गांधी चौकातून या मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष करत, संविधानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या मार्चची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.
