‘जाओ..बहुत बड़े बनोगे…’ जेव्हा पंडीत जवाहरलाल नेहरूंनी दिली होती सचिन पिळगावकरांना शाबासकीची थाप

मुंबई : अभिनेतेसचिन पिळगावकरयांचे अनेक किस्से सध्या व्हायरल होत आहेत. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरुवात केली. हा माझा मार्ग एकला हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यावेळी सचिन यांची भेट पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याशी झाली. नेहरूंनी छोट्या सचिन यांना पाहून प्रोटोकॉल मोडले आणि मांडीवर बसवलं. कपिल शर्मा शोमध्ये एकदा सचिन पिळगावकर यांनी हा किस्सा सांगितला होता.
सचिन यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, “1963 हे वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. कारण मी माझ्या ‘हा माझा मार्ग एकाला’ या पहिल्या मराठी सिनेमासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. हा पुरस्कार मला देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळणार होता. एक दिवस आधी या पुरस्कारांची तालिम केली जाते. माझीही झाली होती. पुरस्कार घ्यायचा काहीही न करता परत यायचं हे मला सांगण्यात आलं होतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *