‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनं मधुराणीला नवी ओळख दिली. मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मधुराणी काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री मधुराणी गोखले मालिका विश्वात कमबॅक करतेय. मधुराणी पुन्हा एकदा आईच्या भुमिकेत दिसणार आहे. मात्र ही आई थोडी वेगळी असणार आहे. मधुराणीचा नव्या मालिकेतील पहिला लुक समोर आला आहे. मधुराणीला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून पाहताना प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

