
मुंबई : चला हवा येऊ द्या या शोचा नवा सीझन येत्या 26 जुलैपासून सुरू होतोय. यावेळी निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. तर लेखन आणि दिग्दर्शकांची टीम देखील बदलली आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव चला हवा येऊ द्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हवा येऊ द्याच्या प्रोमोमध्ये प्रियदर्शन अभिनय करताना दिसला होता. पण शोमध्ये त्याचा नेमका रोल काय आहे हे त्याने स्वत:च सांगितलं आहे.
प्रियदर्शनने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि “जेव्हा ‘फु बाई फु’ सुरु होत तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो पण काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. पण जेव्हा मला ‘चला हवा येऊ द्याच्या’ नवीन पर्वासाठी विचारण्यात आले तेव्हा वाटलं की पुन्हा घरी परतत आहे. माझ्या करिअर मध्ये झी मराठीचा मोलाचा वाटा आहे.”
