
शनि शिंगणापूर : अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ शनिचरणी लीन झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून संजय शिरसाठ यांच्यावर आरोपांची मोठी मालिका सुरू झाली आहे. आपल्यावरील सगळी संकटे थांबावीत, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
संभाजीनगरमधील हॉटेल खरेदी प्रकरण मागे पडत नाही तोच त्यांचा पैशांनी भरलेल्या बॅगचा कथित व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली. अधिवेशन काळामध्ये शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी अडचण झाली होती. शिरसाट यांच्यावरील आरोपांनी पक्षाची कोंडी झाली होती.
