थिएटर गाजवलं, आता ‘सैयारा’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे होणार रिलीज?

दिग्दर्शक मोहित सुरीच्या सिनेमाची जादू सध्या संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहे. ‘सैयारा’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. अहान पांडे आणि अनित पद्ढा यांच्या चित्रपटाच्या कमाईने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सिनेमाला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांनी मूव्ही पसंत पडत आहे.
अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप गाजत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांचेही खूप कौतुक होत आहे. ‘सैयारा’च्या गाण्यांवर बरेच रील्सही बनवले जात आहेत.
‘सैयारा’, ‘एक व्हिलन’ आणि ‘आशिकी 2’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी ओपनिंग आहे. ‘एक व्हिलन’ ने 16.70 कोटींची सुरुवात केली आणि ‘आशिकी 2’ ने 6.10 कोटींनी सुरुवात केली.
‘सैयारा’ या चित्रपटाने 21 कोटींचा कलेक्शन करून चांगली सुरुवात केली आणि आतापर्यंत त्याने तब्बल 109 कोटींची कमाई केली आहे. कोणत्याही पदार्पणातील अभिनेत्याच्या चित्रपटासाठी 109 कोटींचा कलेक्शन होणे ही मोठी गोष्ट मानली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *