ऐन दिवाळी सणांच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी केली अटक

दोन माऊजर- दोन देशी कट्टे -खंजर -35 काडतुसे, बुरखे, जॅकेट – ग्लोव्हज असा मोठा मुद्देमाल ताब्यात

ऐन दिवाळी सणांच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली. दोन माऊजर- दोन देशी कट्टे -खंजर -35 काडतुसे, बुरखे, जॅकेट – ग्लोव्हज असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून एका डस्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. छोटु सूर्यवंशी नामक कुख्यात गुन्हेगार व त्याचे तीन अन्य साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हेगार व साथीदारांना अटक करून नेमका कुठला घातपात घडवण्यास ते शहरात आले होते याचा तपास सुरू करण्यात आलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *