,तर काही तासाच्या अंतराने सुधीर मुनगंटीवार देखील पोहोचले भेटीला, दोघांनीही राज्यातील भाजपच्या विजयाबाबत अभिनंदन केल्याची सोशल मीडियातून दिली माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपच्या मोठ्या पराजयानंतर जिल्ह्यातील भाजपात वादाचे वादळ उठले आहे. दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपद न दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यांनी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरही शाब्दिक हल्ले केले होते.
वक्तव्ये आणि विधानांच्या गदारोळात मुनगंटीवार गटविरोधी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तातडीने मुंबईत पोचत वर्षा निवासस्थानी आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर काही तासाच्या अंतराने सुधीर मुनगंटीवार देखील फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले.
दोघांनीही राज्यातील भाजपच्या विजयाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केल्याची माहिती सोशल मीडियातून दिली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या वादावर तोडगा काढण्यासाठी या भेटीगाठी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रपूर शहर मनपाच्या तिकिटवाटपाआधी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे.
