चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला.साईबाबांची 31,000 दिव्यांची मनोहारी रांगोळी दिव्यांच्या माध्यमातून काढण्यात आली.
शहरातील सरदार पटेल महाविद्यालयाच्या मैदानात ही भव्य दीप रांगोळी काढण्यात आली. सर्वांच्या आयुष्यात अंधःकार नाहीसा होत सुखाचे क्षण येण्यासाठी हा दीपोत्सव साजरा झाला. ड्रोनच्या माध्यमातून साई प्रकाशाची मनोहारी दृश्ये टिपली गेली.

