इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना चंद्रपूर शहरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत.घरपोच गॅस पुरवठा सुरू असल्याच्या चर्चा असतानाही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे.
परिणामी एजन्सीसमोर गर्दी वाढत असून नागरिक आणि एजन्सी मालकांमध्ये वादाच्या घटनाही समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. मात्र तरीही परिस्थिती अद्याप जैसे थेच असल्याचे चित्र चंद्रपुरात पाहायला मिळत आहे.
