मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी; चंद्रपूर शहर युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम राखणे ही निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या गंभीर शंका आणि आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेश मुरली अडूर चंद्रपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी आज चंद्रपूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांची जपणूक या विषयांवर निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे काम करावे आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली.
निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी चंद्रपूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष तथा विरोधीपक्ष नेता मनपा,राजेश अडूर,नगरसेवक सचीन कात्याल,विनोद लाभाने,आकाश मानकर प्रवीण वडलूरी,अजय चिनुरवार,अक्षय आवले,प्रकाश देशब्रतार,संकेत रायपूरे रागु रामगिरी,कुणाल सोनटक्के,वतीने करण्यात आली.

आपला
राजेश मुरली अडूर
अध्यक्ष
चंद्रपूर शहर युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *