चंद्रपूर जिल्ह्यात चांदा फोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर आणखी एका वाघाचा मृत्यू

भरधाव रेल्वेच्या धडकेने सिंदेवाही रेल्वे स्थानकाजवळ आढळले शव, हिरव्यागार जंगलातून जाणा-या या रेल्वे मार्गावर वारंवार होत आहेत वन्यजीव मृत्यू, जय वाघाचा वंश असलेला बिट्टू याचा ताज्या घटनेत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

चंद्रपूर जिल्ह्यात चांदा फोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर आणखी एका वाघाचा मृत्यू झालाय. भरधाव रेल्वेच्या धडकेने सिंदेवाही रेल्वे स्थानकाजवळ बिट्टू नामक वाघाचे शव आढळले. हिरव्यागार जंगलातून जाणा-या या रेल्वे मार्गावर वारंवार वन्यजीव मृत्यू ओढवत आहेत. बिट्टू जय वाघाचा वंश आहे. या रेल्वेमार्गावर होणाऱ्या वन्यजीव मृत्यूची नागपूर उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यावर उपाययोजना न केल्यास रेल्वेची गती निर्धारित करण्याचा आदेश देण्याचा इशारा न्यायालयाने दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *