टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, 3 मॅच विनर बाहेर, गिलने शेवटच्या क्षणी काढलं ‘ब्रम्हास्त्र’!

मॅनचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टेस्ट मॅचला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. पाच मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंड आधीच 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणाऱ्या या सामन्यातील खेळपट्टी एजबॅस्टन आणि लॉर्ड्ससारखीच असणार आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात खेळपट्टीवर तडे जाण्याची शक्यता आहे.
चौथ्या टेस्टआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अर्शदीप सिंग चौथ्या टेस्टमधून बाहेर झाला आहे, तर नितीश रेड्डी पूर्ण सीरिजमध्ये खेळणार नाही. आकाश दीपही दुखापतीमुळे चौथ्या टेस्टला मुकण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये कर्णधार शुभमन गिलकडे डावखुरा स्पिनर कुलदीप यादवला खेळवण्याशिवाय पर्याय दिसत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *