पहाटे चंद्रपूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्रा मध्ये घडली.दरम्यान, 2025 सालात आतापर्यंत एकूण 10 वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेमुळे जंगलातील भ्रमनमार्ग बाधित झाले असून, वाघ, अस्वल, सांबर, बिबट्या अशा अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.हा रेल्वेमार्ग तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड–करहाडला, नवेगाव–नागझिरा या महत्त्वाच्या जंगलांना जोडणाऱ्या वन्यजीवांच्या भ्रमनमार्गातून जातो.तरीसुद्धा, रेल्वे प्रशासन आणि वनविभागाकडून आवश्यक उपशमन योजना राबविण्यात आलेली नाही, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.वन्यजीवांच्या या सलग होणाऱ्या मृत्यूंमुळे पर्यावरणप्रेमी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
