चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याने घुग्गुस शहरावर शोककळा पसरली आहे. काल दुपारी इंदिरानगर घुग्गुस येथे राहणारे हे युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते परतले नाहीत. पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ग्रामस्थांनी राबविलेल्या शोध अभियानात तन्मय पथाडे नामक युवकाचा मृतदेह गवसला आहे. सकाळपासून शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे.
1. शिव भास्कर केलझरकर वय 19
2. तन्मय नवनाथ पथाडे वय १८ 3. सम्यक देवराव सोनटक्के वय १८
4. संनी अशोक आस्मपेल्ली वय १९
5. रोहित बाबाराव बोबडे वय १९
सर्व राहणार घुग्गुस अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
