गो तस्कर आणि कत्तली बाबत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आज एक मोठा निर्णय घेतला. आगामी बकरीत सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सतर्क होत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ड्रिल शेडमध्ये जिल्ह्यातील 293 सराईत गो तस्कर आणि गुन्हेगारांची चक्क ओळख परेड घेतली. या सर्वांना गोतस्करीत सहभागी न होण्याचे निर्देश स्पष्टपणे देण्यात आले. याशिवाय या सर्वांकडून भारतीय न्याय संहिते अंतर्गत बंधपत्रही भरून घेण्यात आले. बंध पत्रानंतरही एखाद्या कारवाईत गो तस्कर सहभागी असल्याचे आढळल्यावर त्यांच्यावर थेट मकोका अंतर्गत रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
