प्रचंड प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यात त्यांनी इथल्या स्थितीबद्दल व्यक्त केली होती नाराजी
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस जवळची महामाया कोल वॉशरी अचानक बंद करण्यात आल्याने 700 कुटुंबांवर बेरोजगारीचं संकट कोसळलय. महामाया कोल वॉशरी मुळे प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या भागाचा दौरा केला होता. विशेष म्हणजे विधानसभेच्या या अधिवेशनात देखील महामाया कोल वॉशरी वर कारवाई न झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उचलण्यात आला होता. त्यामुळे प्रदूषण विभागाने या कोल वॉशरी ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच कोल वॉशरी व्यवस्थापनाने ही कोल वॉशरी तातडीने बंद केली आहे. मात्र यामुळे या भागातील 700 कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळलं आहे. घुग्गुस परिसरातील इतर प्रदूषणकारी उद्योग राजकीय नेत्यांना दिसत नाही का असा सवाल या मजुरांनी उपस्थित केलाय.
