चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहराजवळील मुल-सोमनाथ मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेमध्ये दुचाकीवर असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झालाय. मुल शहराच्या अगदी जवळ असलेल्या बल्की मारुती मंदिरा जवळ ही भीषण दुर्घटना झाली.
दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की अपघातानंतर रस्त्यात गाडीचे स्पेअर पार्ट विखुरले गेले. मृतकांमध्ये यश शेंडे (25/मारोडा), देविदास शेंडे (46/मारोडा) या पिता-पुत्रासह वासुदेव सहारे (49/भादूरणी) यांचा समावेश आहे. अपघातानंतर मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
