परवानगी नसताना कामांचे कार्यादेश दिल्याचा ठपका
काहीच दिवसांपूर्वी कक्षात 20 हजार रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. याआधी त्यांना जिल्ह्यातील आमदारांनी तक्रारी केल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र मॅट च्या निर्णयात त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले. चंद्रपुरात घेण्यापूर्वी पेंढे वर्धा येथेही कार्यरत होते. त्या ठिकाणी देखील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता.
ताज्या प्रकरणात परवानगी नसताना त्यांनी काही कामांचे कार्यादेश स्वतः जारी केले असून कार्यालयात सतत गैरहजर राहण्याचाही दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी पेंढे यांच्या कक्षात वीस हजार रुपये लाचेची रक्कम घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आम आदमी पक्षाने याबाबत प्रकरण लावून धरले होते. पेंढे यांच्या निलंबनासाठी हा देखील आधार असल्याचे बोलले जात आहे.
