चंद्रपूर पोलिसांवर मानसिक छळ आणि लाचखोरीचे गंभीर आरोप, दिलीप यादव नामक तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रकरण सीआयडी कडे वर्ग

चंद्रपूर शहर पोलिसांवर मानसिक छळ आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करत दिलीप यादव नामक तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण सीआयडी सोपविण्यात आले आहे. आत्महत्येूपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये ‘ नाव ‘ घेतलेल्या शहर पोलिस ‘ स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, शिपाई रुपेश पराते आणि महिला शिपार्ड भावना रामटेके या तिन्हीं पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने शहर पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.

मृत दिलीप यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी’ एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा आरोप् केला होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सीआयडी तपासाचे आदेश देण्यात आले असून, काल रात्रीच ‘सीआयडी’ची चमू चंद्रपुरात दाखल झाली आहे. घटना अत्यंत संवेदनशील असल्याने मृत दिलीप यादव याच्या मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा आणि शवविच्छेदन प्रक्रिया मॅजिस्ट्रेटच्या समक्ष आणि प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली. आता या प्रकरणात मॅजिस्ट्रेट आणि सीआयडी यांच्याकडून समांतर तपास केला जाणार असून, साक्षीदारांचे जबाब व पुराव्यांची तपासणी दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *