# परमेश्वर मेश्राम यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही, बाळू धानोरकर यांनी जे शेत परमेश्वर मेश्राम यांच्याकडून घेतलं ते शेत 2006 ला बाळू धानोरकर यांनी मला विकलं
# मात्र परमेश्वर मेश्राम यांची बहीण आणि भावाने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे माझ्या नावावर फेरफार झाला नाही आणि त्याबद्दलची केस आताही नागपूर हायकोर्ट मध्ये सुरू आहे
# परमेश्वर मेश्राम यांची कुठलीही केस आमच्या विरोधात सुरू नाहीये
# परमेश्वर मेश्राम यांची आमच्या विरोधात त्यांची कुठलीही केस नसल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या बाजूने कुठलाही निकाल लागलेला नाही
# पुढे निवडणुका आहे त्यामुळे राजकारण केलं जात आहे, बिन बुडाचे आरोप केले जात आहे
# मला खासदार धानोरकर मॅडम यांच्या भावाचा फोन आला होता की परमेश्वर मेश्राम यांचा मुलगा त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करत आहे, पण आपल्या विरोधात कुठलीच केस नसल्यामुळे मी त्यांना पैसे देऊ नका म्हणून सांगितलं
# माझ्याकडे ज्याप्रमाणे सर्व कागदपत्रं आहे तसे त्यांनी कोर्टाचा निकाल लागल्याचे कागदपत्र दाखवावे
# परमेश्वर मेश्राम यांच्या निधनाबद्दल मलाही दुःख आहे, कोर्टातून याबाबतीत जे काही खरं-खोटं आहे ते बाहेर येईल
