विद्यमान राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप
या सरकारने संपूर्ण राज्यात जाती जातीत ,समाजात भांडणे लावण्याचा प्रकार केल्याची टीका
राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सातत्याने झालेल्या पावसाने सोयाबीन, कापूस ,तूर या पिकांना जोरदार फटका बसला आहे. मात्र नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश झालेला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला इशारा देत काँग्रेसने मोर्चाची मालिका सुरू केली आहे.
राजुरा येथे अशाच एका मोर्चाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. हा मोर्चा राजुरा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात या राज्य सरकारने दुटप्पी भूमिका घेतली असून सरकारने राज्यातील जातीजातीत, समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न चालवला असल्याची टीका देखील काँग्रेसने केली आहे.
