चंद्रपुरात रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्ष प्रारंभाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला

यानिमित्ताने शहरातील पोलीस फुटबॉल मैदानातून शिस्तबद्ध पथसंचलन निघाले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मूळ गावी चंद्रपुरात झालेले पथसंचलन संख्येच्या संदर्भात ऐतिहासिक ठरले. कार्यक्रमाला संघाचे अ. भा सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेला वंदन, आणि शस्त्रपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. स्वयंसेवकांच्या सामूहिक व्यायाम आणि गितगायनानंतर केलेल्या संबोधनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सज्जन शक्तीच्या एकत्रीकरणातून भारताच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत असल्याचे प्रतिपादन प्रदीप जोशी यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *