चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडीजवळ जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत जुगार खेळणाऱ्या तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले आहे. टॉवर टेकडीजवळील जंगलात काही इसम एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश मिळवलं.
या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम असा एकूण 40 लाखाची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
