मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देत नोंदी सापडत नसलेल्या कुणबी मराठ्यांसाठी सुवर्ण मध्य काढल्याची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले आंदोलन व त्याला राज्य सरकारने दिलेल्या प्रतिसाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिवार अभिनंदन करणारा आहे. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण ई डब्ल्यू एस आहेच मात्र कुणबी -मराठा, मराठा -कुणबी आणि कुणबी यांच्या ज्या नोंदी सापडत नव्हत्या. त्याबाबत हैदराबाद गॅझेटीयर चा आधार घेण्यात आला असून यात काहीही आश्चर्य नाही. ओबीसी समाजाचे यात कुठलेही नुकसान होणार नाही. हा सुवर्णमध्ये साधला गेल्याची प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते प्रा. डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे.
