स्वामी शिवकृपानंद फाउंडेशनच्या वतीने युवकांमधील आंतरिक ऊर्जा जागवण्यासाठी शिबिराचे आयोजन
चंद्रपुरात व्यसनमुक्त भारतासाठी समर्पण ध्यान योग शिबिराचे आयोजन शहरातील पोलीस मुख्यालया जवळच्या पोलीस कल्याण सभागृहात करण्यात आले. स्वामी शिवकृपानंद फाउंडेशनच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले गेले.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी यात सहभाग घेतला. स्वामी शिवकृपानंद यांच्या उपस्थितीत त्यांच्याच फाउंडेशनच्या वतीने युवकांमधील आंतरिक ऊर्जा जागविण्यासाठी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ध्यान योग शिकविला गेला. आजच्या ताणतणावाच्या आयुष्यात भारताची पारंपरिक ध्यान साधना युवकांना शिकविली गेली पाहिजे असे मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.
