अवैध रेती तस्करीला साथ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल, गृह आणि महसूल खात्याने एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश

अवैध रेती तस्करीला साथ देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल असे सांगत गृह आणि महसूल खात्याने एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे आयोजित जमीन पट्टेवाटप कार्यक्रमात त्यांनी अवैध रेती वाहतुकीची माहिती थेट मला द्या असे आवाहन केले. सरकार रेती तस्करी टाळण्यासाठी घाट लिलाव प्रक्रिया राबवत असून स्थानिकाना घाटातील 10 टक्के रेतीवाटा राखीव ठेवला जाणार आहे, हे स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *