ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेजच्या मागणीसाठी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे चक्का जाम आंदोलन

सुमारे 120 टक्के पर्जन्यमान सोसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेजच्या मागणीसाठी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात आंदोलनात सहभाग घेतला. चंद्रपूर- नागपूर महामार्गावर या आंदोलनाने दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेज द्या , शेतकऱ्यांनाहेक्टरी 50 हजार मदत द्या, संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा मागण्या याप्रसंगी पुढे रेटण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *