चंद्रपूर जिल्ह्याची कन्या ज्ञानेश्वरी दुणेदार हिने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला आहे. फक्त 2 फूट 3 इंच फूट उंचीची असलेल्या ज्ञानेश्वरीचे नाव International Book of Records मध्ये Smallest Woman in the World म्हणून नोंदविण्यात आले आहे. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या नोंदीमागे अलंकार सावळकर आणि योगेश गोखरे यांचे विशेष प्रयत्न राहिले. त्यांच्या पुढाकारातून ज्ञानेश्वरीचे नाव अधिकृतपणे या जागतिक विक्रमात नोंदविण्यात आले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीला सन्मानित करण्यात आले.
