बंजारा समाज घटकाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकवटले बंजारा
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाज घटकाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजबांधव एकवटले. जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकले.
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्याची मागणी करण्यात आली. सेवालाल महाराजांच्या जयघोषाने राजुरा शहर दुमदुमले. बंजारा समाज बांधवांच्या प्रमुख धार्मिक नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
