चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात एटीएम कटींग करून 11 लाख रुपये चोरी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश, राजस्थानचा 1 आरोपी अटकेत

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एटीएम कटींग प्रकरणातील आरोपींपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री पोरटे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममधून गॅस कटरच्या साहाय्याने 11 लाख चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकांनी १३ दिवसात सुमारे ९०० ते १००० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढला. त्यातून राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील जिल्ली सिरदार खान (वय ५२ वर्ष) याला चिन्नूर, जिल्हा मंचेरियाल (तेलंगणा) येथून ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणातील इतर 3 आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *