शुभमन उतरवणार ‘हुकमी एक्का’, Kuldeep Yadav खेळणार की नाही? मोहम्मद सिराजने दिली मोठी अपडेट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 जुलै 2025 रोजी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ लॉर्ड्समधील पराभवानंतर 2-1 अशा पिछाडीवर आहे आणि मालिकेत बरोबरी साधण्यासाठी त्यांच्यावर कामगिरी सुधारण्याचे दडपण असेल. अशातच आता टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं असताना टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद सिराज याने पत्रकार परिषद घेतली.
कुलदीप यादवला खेळवणार की नाही?
मोहम्मद सिराजने मँचेस्टरमध्ये सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भाग घेतला होता. त्यावेळी मोहम्मद सिराज याला कुलदीप यादवला खेळवणार की नाही? असा सवाल विचारला गेला. त्यावर मोहम्मद सिराज याने प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाला मोहम्मद सिराज?
कुलदीप यादवच्या प्रश्नावर मोहम्मद सिराज याने उत्तर दिलं. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी नुकताच सरावावरून आलो आहे आणि मला माहित नाही की आम्ही कोणत्या संयोजनासह मैदानात उतरू. पण ते काहीही असो, मला ते खेळासाठी सर्वोत्तम हवे आहे, असं मोहम्मद सिराज म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *