भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संघाने ओमानचा सहा विकेट्सने पराभव केला. हर्ष दुबेने नाबाद अर्धशतक झळकावले आणि एक विकेट घेतली.

भारत अ संघाचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ओमानने २० षटकांत ७ गडी गमावून १३५ धावा केल्या. वसीम अलीने सर्वाधिक नाबाद ५४ धावा केल्या. भारताकडून गुर्जपनीत सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारत अ संघाने १७.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. संघाकडून हर्ष दुबेने नाबाद ५३ धावा केल्या. आर्यन बिष्टने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *