महाराष्ट्रात प्रथमच उबाठा शिवसेनेने अशा प्रकारे जाहीर केली आगामी निवडणुकांबाबत भूमिका
आगामी मनपा, जि. प. आणि पं. स. निवडणूकीत शिवसेना उबाठा ने जिल्हास्तरावर एकला चलो रे चा नारा दिला आहे. मविआ शी प्राथमिक चर्चा झाली मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आघाडी झाली तर उत्तम मात्र आमची तयारी असल्याची भूमिका पुढे मांडण्यात आली आहे.
पक्ष श्रेष्ठींनी निवडणूक असलेल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून मनपा मध्ये उत्तम कामगिरी करू असा विश्वास उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. मनसेशी युतीबाबत पक्षादेश जो असेल तो पाळून पुढे जाऊ असेही मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. महाराष्ट्रात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेत उभाठा शिवसेनेने प्रथमच निर्णय जाहीर केला आहे.
